 
                     
                     
                     
                     
                     
                     
                     
                     
                     
                     
                     
                    महाशय, धवल क्रांतीच्या अविरत कार्या मध्ये आपले कार्य अनन्यसाधारण आहे. आपल्या प्रयत्नाने माझ्या सारखे असंख्य दुध उत्पादक आज या प्रक्रियेत मानाने स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहत आहेत. याचाच एक भाग म्हणून आपल्या प्रयत्नाने धवल क्रांतीचे प्रणेते मा. स्व. डॅा. वर्गीस कुरीयनजी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमा मध्ये आपण माझ्या सारख्या सामान्य दुध उत्पादक शेतकऱ्याची जी निवड केली ती दुग्धउत्पादनास प्रेरणा देणारी अशीच आहे.
आपण या निमित्ताने आम्हाला राष्ट्रीय स्तरावरील जे व्यासपीठ मिळवून दिले त्या बद्दल मी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. तसेच माझा हा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि सचोटीने करण्यास कटिबद्ध राहीन हीच डॅा. वर्गीस कुरियन सर यांना आदरांजली असेल. पुनश्च धन्यवाद
